मुंबई पोलिसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत,मिळणार 'या' सुविधा

मुंबई : मुंबई पोलीसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत. बॅंकतून त्यांना पोलिसांना १ कोटी विमा कवच आणि इतर सुविधा मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ साली अ‍ॅक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत ३१ जुलै २०२० रोजी संपली आहे. त्यानंतर राज्य सरकारने एचडीएफसी बॅंकेत पगार करण्याचा निर्णय घेतला.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अ‍ॅक्सिस बँकेत उच्च पदावर असल्याने २०१५ साली सरकारने पोलीसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप तेव्हा विरोधकांनी केला होता.या पार्श्वभुमीवर अ‍ॅक्सिस बँकेंसोबतचा करार संपल्यानंतर नवी बँक निवडण्यासाठी पोलीस दलाने प्रस्ताव मागवले होते.

एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलीसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एचडीएफसी बँक पोलिसांनी द१० लाख रुपयांचं विमा कवच देणार आहे.नैसर्गिक किंवा कोविडमुळे मृत्यू झाल्यास १० लाखाचे विमा संरक्षण, अपघाती मृत्यू आल्यास १ कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास ५० लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना १० लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास ३० दिवसांपर्यंत प्रति दिन १ हजार रुपये मदत अशा सुविधा मुंबई पोलीस दलातील कर्मचारी, अधिकार्‍यांना एचडीएफसी बँक देणार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट