विरोधक तर बिहारमध्ये आहेत, महाराष्ट्रावरील संकटावेळी शरद पवार धावून येतात
- by Adarsh Maharashtra
- Oct 18, 2020
- 1383 views
बीड १८ऑक्टोबर: एका बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उस्मानाबादमधील अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहे.
परतीचा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शरद पवार उस्मानाबादेत दाखल झाले आहे. शहरात दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ‘शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेऊन भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत’ असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालक मंत्री धनंजय मुंडे हे बांधा बांधावर जाऊन पाहणी करत आहेत, त्याच प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ही आज उस्मानाबाद, लातूर दौरा सुरू आहे. राज्यावर आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्ण हवालदिल झाला आहे. मुख्यमंत्री आणि महाविकासआघाडीचे सर्वच पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी करण्यासाठी बांधा बांधावर जात आहेत.या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. ते म्हणाले की, ‘सध्या विरोधक महाराष्ट्रात कुठे आहेत? ते तर बिहार मध्ये आहेत .जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट येतात तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरदचंद्र पवार मदतीला धावून येतात. मग ते सत्तेत असो अथवा नसो ‘ असे पालकमंत्री धनंजय मुंडे या वेळी बोलतांना म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम