कोविड-१९ मुळे मेंदूत जळजळ होणाऱ्या एका महिलेला वाचवण्यात डॉक्टरांना यश

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात यशस्वी उपचार

मिरारोड :पालघर जिल्ह्यात राहणाऱ्या एका ४७ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला दुर्मिळ असा एन्सेफलायटीस म्हणजे (मेंदूत जळजळ) होणं ही समस्या दिसून आली होती. विशेषतः कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये श्वसनासंबंधित विकार पाहायला मिळतात. परंतु, मागील काही काळात कोरोना रूग्णांमध्ये गुलियन-बॅरी सिंड्रोम किंवा स्ट्रोक संबंधित विकार झाल्याचं निदर्शनास आले आहे. परंतु, या महिलेला मेंदूत जळजळ होत असल्याचे आढळून आलं आहे. अशा गंभीर परिस्थितीत मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करून या महिलेचे प्राण वाचवले आहे.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील न्युरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमनं ही या महिलेवर यशस्वी उपचार केले आहेत.

शाइस्ता पठाण असं या महिलेचं आहे. मागील काही दिवसांपासून या महिलेला पोटदुखी व डोकेदुखीचा त्रास जाणवतं होता. १३ ऑगस्ट रोजी स्थानिक डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले. परंतु, प्रकृती अधिकच खालावू लागल्याने कुटुंबियांनी या महिलेला मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात दाखल केले.

मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै म्हणाले की, ‘‘या महिलेला १४ ऑगस्ट रोजी रूग्णालयात आणले तेव्हा त्यांच्या ओटीपोटीत तीव्र वेदना होत होती. यापूर्वी त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार झालेला नव्हता. मात्र, एका चुलतभावाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याने त्याच्यावर दुसऱ्या रूग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेच्या पोटाचा, छातीचा व मेंदूचा सीटीस्कॅन करण्यात आला. या महिलेची अँण्टीजन चाचणी निगेटिव्ह आली होती. रक्ताचा अहवालातही सामान्य होता. १५ ऑगस्ट रोजी मेंदूच्या एमआरआय रिपोर्टमध्ये रक्तस्त्राव होत असल्याचे निदान झाले. त्यांच्या मानेला ताठरपणा आला होता. अशा स्थितीत कोविड-१९ चाचणी केली असता ती पॉझिटीव्ह आली. याशिवाय या आजारासह त्यांना एन्सेफलायटीस हा व्हायरसची लागण झाल्याचेही निष्पण्ण झाले. त्यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले.’’

कोविड-१९ रूग्णांमध्ये खोकला, श्वास घेण्यास अडचणी येणं आणि ताप अशी साधारण लक्षणं दिसून येतात. अलिकडे सध्या मेंदूसंबंधित गुलियन बॅरी सिंड्रोम, स्नायूंचा आजार आढळून येत आहेत. त्यातत आता या महिलेमध्ये एन्सेफलायटीस हा व्हायसर दिसून आला आहे. मेंदूत संसर्गामुळे एन्सेफलायटीस हा आजार होतो. या आजारात मेंदूला सूज येणं आणि मेंदूत जळजळ होणं हीकोविड-१९ मुळे मेंदूत जळजळ होणाऱ्या एका महिलेला वाचवण्यात डॉक्टरांना यश 


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट