युनियनच्या दणक्याने पालिकेच्या कंत्राटी कामगारांना मिळाला पगार
- by Adarsh Maharashtra
- Oct 14, 2020
- 1205 views
मुलुंड :(शेखर भोसले) पालिकेच्या मुलुंड येथील टी वार्डातील मलेरिया खात्या अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना ठेकेदाराकडून वेळेवर पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून कामगारांमार्फत करण्यात येत होत्या. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडे यासंदर्भात तक्रारी आल्यावर युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका प्रशासनाकडे दाद मागून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यात यावा यासाठी अनेक बैठकी घेतल्या तसेच कंत्राटदाराला दणका दिला. अखेर युनियनच्या प्रयत्नांना यश येऊन कंत्राटदाराने या सर्व कामगारांना पगार दिला व यापुढे वेळेवर पगार देण्याचे आश्वासन दिले.
युनियनच्या प्रयत्नाने पगार मिळाल्यामुळे खुश झालेल्या या कंत्राटी कर्मचार्यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून आभार मानले. यावेळी युनियनचे चिटणीस हेमंत कदम, संजय वाघ, अजय राऊत, गणेश कदम, किशोर कोट उपस्थित होते.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम