मंदिरे उघडा म्हणणारे स्वभक्तांची किती काळजी घेतात?
- by Adarsh Maharashtra
- Oct 14, 2020
- 2014 views
मुंबई :गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कोरोनामुळे सारे जग विस्कळीत झाले आहे. संपूर्ण जगातील जनता कोरोनाचा मुकाबला करीत असताना महाराष्ट्रातील काही मंडळी कोरोनाच्या परिस्थितीत राजकीय स्वार्थासाठी समाजाला वेठीस धरत आहेत आणि त्यांचे भक्तगणही किमानपक्षी स्वतःची आणि स्वकुटुंबांची काळजी न घेता अशा मंडळीच्या मागून घंटानाद, थाळीनाद करीत फिरत आहेत हे दुदैव म्हटले पाहिजे अशी खंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे पालकाच्या भुमिकेतून राज्यातील जनतेची काळजी घेत असताना घरातील देवाच्या तसबिरीसमोर कधीही नतमस्तक न होणारे काही राजकीय पक्षाची मंडळी चुकीची आंदोलने करीत आहेत; आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत. कोरोनाने अनेकांचे बळी घेतले आहेत, आणि त्याचा प्रार्दूभाव कायम आहे. देशाचे पंतप्रधान,आरोग्य मंत्री जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करीत आहेत. धर्मगुरुनी, राजकीय पक्षाच्या आहारी न जाता,समाजाला आधार देण्याचे काम करणे गरजेचे आहे. आज गोवा,गुजरात, उत्तरप्रदेश एवढेच नाही तर जगातील प्रसिद्ध धार्मिक स्थळे बंदच आहेत असे असताना महाराष्ट्रातच हा अट्टाहास का?केवळ श्रद्धा व आस्था समोर करून भावनिकता भडकावून देवाच्या नावाने स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचाच हा प्रकार म्हटला पाहिजे भक्तानो जरा सबुरीने घ्या.घरच्या देवाला नमस्कार करा.फावल्या वेळेत किमान "आरत्या" पाठ करा.राज्यात काही मूठभरांच्या राजकीय स्वार्थासाठी अशांतता पसरवू नका.देव मनामनात हवा.मंदिरे उघडा म्हणणारे उपाशीपोटी मागून धावणारे आंदोलन करीत घंटानाद करणाऱ्यां भक्तांचे घर कोरोनाच्या परिस्थितीत कसे चालले आहे. याचा विचार करताना दिसत नाहीत. राज्यातील पूरपरिस्थितीबाबत,हाथरस प्रकरणाबाबत,मुंबईसह महाराष्ट्रास दुसणे देणाऱ्यांबाबत,मोडकळीस आलेल्या इमारतींच्या,पुर्नविकासाबाबत बेरोजगारी बाबत,शाळा चालकांच्या मुजोरीबाबत बेकायदा बांधकामांबाबत,अमली पदार्थांच्या तस्करीबाबत,भ्रष्टाचाराबाबत मात्र आंदोलन छेडताना दिसत नाहीत अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम