अभिजात नाट्य संस्थेच्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त अभिजात नाटकांच्या आठवणी
- by Adarsh Maharashtra
- Oct 13, 2020
- 390 views
मुंबई (प्रतिनिधी) १३ आॅक्टोबर १९६९ ते १३ आॅक्टोबर २०२० अशी ५१ वर्षांची अभिजात नाट्य संस्थेची यशस्वी वाटचाल ! निर्माते अनंत काणे यांनी १३ आॅक्टोबर १९६९ रोजी "अभिजात" या संस्थेची स्थापना केली.अभिजात या संस्थेतर्फे मन पाखरु पाखरु, धुक्यात हरवली वाट, सुरुंग, सुर राहु दे, गुंतता ह्रदय हे, हसत हसत फसवुनी, मला भेट हवी हो, गहिरे रंग, गुलाम, वर्षाव, आणि रेशीम धागे , या सारख्या दर्जेदार व लोकप्रिय नाटकांची निर्मिती केली. विशेषतः या सर्वच नाटकांचे लेखक श.न्ना.नवरे होते तर दिग्दर्शन नंदकुमार रावते यांनी केले होते.त्याचप्रमाणे सर्वच नाटकांचे नेपथ्य व प्रकाश योजना बाबा पार्सेकर यांची होती आणि पार्श्वसंगीत अरविंद मयेकर यांचे होते.अभिजातच्या या नाटकांत सुप्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे, डाॅ.काशिनाथ घाणेकर, आत्माराम भेंडे, बबन प्रभु, कमलाकर सोनटक्के, सतीष दुभाषी, रमेश देव, कमलाकर सारंग, यशवंत दत्त, राजा मयेकर, रविन्द्र मंकणी, राजा बापट, शंकर घाणेकर, शशीकांत राजाध्यक्ष, गणेश सोळकी, अशोक पाटोळे, सुमित राघवन, सुधीर दळवी, भाऊ बिवलकर, नाना पोळ,बाबा परुळेकर, दिनानाथ टाकळकर, शशीकांत महाडीक, प्रभाकर मोने, प्रविण पाटील, विठ्ठल पणदुरकर, पंढरीनाथ बेर्डे, राजु सावंत, जयवंत बाइंग, छोटु सावंत, वामन शेळकर, कमलाकर टाकळकर, सतिश रणदिवे, गणा प्रधान, सुधीर बावकर, विजय खानविलकर , चंदु डेग्वेकर, अनंत मिराशी, तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण , आशा काळे , आशालता , शांता जोग, पुष्पा भोसले , आशु , लता अरूण , संजीवनी बिडकर , निना कुळकर्णी , रजनी जोशी , सुमन धर्माधीकारी, सुनिति जोशी , शालिनी सावंत , मालती पेंढारकर , भावना , सुहास जोशी यासारख्या त्यावेळेच्या प्रथितयश व लोकप्रिय कलाकारांनी अभिनय केला होता. आनंदी गोपाळ हे नाटक ललीत कलादर्श या संस्थेच्या सहयोगाने निर्मित केले होते. अभिजात चा प्रत्येक वर्धापनदिन उत्साहाच्या वातावरणात दिमाखदारपणे साजरा होत असे. वर्धापनदिनाला शास्त्रीय संगीत क्षेत्रातील बुजुर्ग व मान्यवरांच्या गायनाची मैफल आयोजित केली जात असे. या मैफलीत पं.जितेन्द्र अभिषेकी , वसंतराव देशपांडे , अजय पोहनकर , छोटा गंधर्व , परवीन सुलताना , प्रभाकर कारेकर , शोभा गुर्टु या सारख्या बुजुर्ग कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. तसेच अभिजातच्या एका वर्धापन दिनाला शं.न्ना.नवरे लिखीत व नंदकुमार रावते दिग्दर्शित दिवसेंदिवस या नाटकाचा प्रयोग सादर केला होता.५ तास चाललेल्या या नाटकात एकुण १६ प्रवेश होते. अाशा काळे व अशोक पाटोळे यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या या नाटकात . त्यावेळेच्या ५० लोकप्रिय कलाकारांचा सहभाग होता.या नाटकांचा फक्त एकच प्रयोग झाला. मराठी नाटकां बरोबर गुलाम , सो टचनु सोनु आणि केवारे मळेला मनना मेळ या गुजराती नाटकांची निर्मितीही अभिजात तर्फे करण्यात आली होती. केवारे मळेला मनना मेळ या गुजराती नाटकात प्रथमच आशालता यांनी काम केले होते. या नाटकाचे दिग्दर्शन निर्माते अनंत काणे यांनी केले होते.परंतु दुर्दैवाने २००१ मध्ये अभिजात नाट्य संस्थेचे निर्माते अनंत काणे यांचे निधन झाले आणि अभिजात संस्था बंद झाली. अन्यथा आज अभिजात या संस्थेचा ५१ वा वर्धापनदिन साजरा झाला असता यात मुळीच शंका नाही. आता नाट्य क्षेत्रातील रंगकर्मीसाठी आणि नाट्यरसिक मायबाप प्रेक्षकांसाठी मागे उरलेल्या आहेत फक्त अभिजात दर्जेदार नाटकांच्या आठवणी....!
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम