गोंडपीपरी तालुक्यात रेती तस्करी जोमात घाटावर शेकडो ब्रास रेतीचा साठा

गोंडपिपरी (प्रतिनिधी): रेती घाटांचे लिलाव झाले नाही.असे असतांना गोंडपिपरी शहरासह, ग्रामीण भागात अवैध रेती तस्करी जोमात सुरु आहे.यामुळे रेती तस्करीला महसूल विभागाची मूकसंमती तर नाही ना ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.एकिकडे तालुक्यात शासकीय, निमशासकीय बांधकामे जोमात सुरू असतांना मात्र घरकुल लाभार्थ्यांची कामे रेतीअभावी रखडली आहेत.परिणामी लाभार्त्यांची ओरड मात्र कायम आहे.तस्कर बिनधास्त उत्खनन करुण संधीचे सोने साधत आहेत.महसूल विभागाकडून मात्र ठोसपणे कारवाई करतांना दिसत नाही.  

पर्यावरण विभागाने घेतलेल्या भूमिकेमुळे शासन स्तरावरून रेतीघाटांचे लिलाव प्रक्रिया रखडली आहे.याचा थेट परिणाम विविध विकास कामांवर होतांना दिसून येत आहे.यातच तालुक्यातील रेती घाटांचे लिलाव रखडले आहेत.असे असतांना गोंडपिपरी शहरासह ग्रामीण भागात छुप्या मार्गाने दिवस,रात्र तस्करांकडून रेतीचे उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा व्यापार सुरू आहे. मात्र येथील महसूल विभागाने आंधळ्याची भूमिका घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.इकडे घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होत नसल्याने बांधकामे रखडली आहेत. दुसरीकडे मात्र गोंडपिपरी शहरासह ग्रामिण भागात शासकीय, निमशासकीय विकास कामासाठी रेती सहजपणे उपलब्ध होत आहे.यामुळे खरे तस्करांचे रखवाले कोण ? हा सवाल आता समोर येत आहे. महसुल विभागाच्या आशीर्वादानेच रेती तस्करांच्या टोळ्या सक्रीय होत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.शहरासह ग्रामीण भागात सर्रासपणे रेती घाटांचे उत्खनन करून रेती तस्करी होत असतांना या बाबीकडे स्थानिक महसूल विभागाने कानाडोळा करित आहे. यामुळे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून तालुक्यातील बांधकामावर पडलेली रेतीची चौकशी करून अवैध रेती तस्करांवर लगाम घालावा,यासह विभागातील कर्तव्यशुन्य कर्मचाऱ्यांनाही वळनीवर आणावे,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महसूल विभागातद्वारे शासनाच्या तिजोरीत कोट्यवधीचा महसूल जमा होतो.मात्र गोंडपिपरीत महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे चित्र दिसून येत आहे.रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असतांना संबंधित विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.यामुळे शासनाला लाखोंचा चुना लागत आहे.गोंडपिपरीतील रेती तस्करांचे वाढते प्रमाण बघता येते कुंपणानेच शेत खात असल्याचे चित्र आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट