
येनबोथला येथे भाग्यश्री ताई आत्राम यांची भेट,पीडित परिवाराची भेट घेऊन केले सांत्वन
- by Adarsh Maharashtra
- Oct 11, 2020
- 1526 views
गोंडपीपरी(प्रतिनिधी) गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे राष्ट्रवादी च्या गडचिरोली जिल्हा युवती अध्यक्ष माजी जी प अध्यक्ष तथा विध्यमान सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी शुक्रवारी ९ ऑक्टोंबर रोजी पीडित परिवाराची भेट घेऊन सांत्वन करून आधार दिला.
येनबोथला येथे शुक्रवार 2 ऑक्टोंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या काकानेच अतिप्रसंग करून कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासले त्यामुळे भाग्यश्री आत्राम यांनी येनबोथला गाव गाठून परिवाराची प्रत्यक्षात भेट घेऊन पीडित मुलीला आधार देत परिवाराचे सांत्वन केले.
दुर्घटनेच्या दिवशीच मुलीचे आजोबाचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपल्या नंतर पाहुण्यांचे खान-पान सुरू असतांना मद्यधुंद व हैवानियत अवस्थेत असलेला कमलाकर राऊत यांनी कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासले. कुटुंबातील वयोवृद्धाचे निधन झाल्याचे दुःख व चिंता असतांना स्वतःच्या चुलत काकानेच पुतणीवर बळजबरी करून अजून संकट व चिंतेच्या खाईत परिवाराला ढकलले आहे.
अंगावर शहारे आणणारी दुर्घटनेची बाब भाग्यश्री आत्राम यांना समजताच प्रत्यक्षात भेट दिले व मुलीला न घाबरता निर्भीडपणे पुढे येण्याचे व अशा विकृती, कुकर्म कृत्याच्या मानसिकतेला ठेचून काढण्यासाठी पीडित मुलीच्या व परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचे यावेळी सांगितले.
तसेच कौटुंबिक नात्याला व परिवारात दुःखद निधन झाले असतांना बळजबरी व अतिप्रसंग करण्यात आल्याने तीव्र शब्दात निषेध करून हैवानियत आरोपी कमलाकर राऊत याला जेरबंद तर करण्यात आले त्याच्यावर कठोरातील कठोर शिक्षा करण्याची एकमुखी मागणी करून यापुढे असले घाणेरडे प्रकार खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
पीडित परिवाराची सांत्वनपर भेट घेतांना त्यावेळी सोबत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष पूर्वा दोंतुलवार , गोंडपिपरी यंग ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सूरज माडूरवार मुलचेरा चे नगरसेवक नीरज चापले, आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम