अखेर तिघे मित्र गेले दीर्घ प्रवासावर! लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठरला शेवटचा

नाशिक : रात्रीची वेळ...तीन मित्रांचा एका नातेवाइकाकडून परततांनाचा स्कुटीवरील ट्रिपल सीट प्रवास. स्माईल करत फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपवर 'लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर' स्टेट्सही टाकला. पण ते हास्य अन् तो फोटो ही अखेरचाच ठरला. एक दुर्घटना अन् तीन मित्र कायमचीच दीर्घ प्रवासाला निघून गेली.

               अशी आहे घटना

नाशिक  पेठ महामार्गावर उमराळे गावा जवळील कन्हैया ढाब्याजवळ स्कुटी आणि पिकअप यांच्यात झालेल्या हा भीषण अपघात झाला. रोहित शार्दूल (रा. दिवा, मुंबई), निशांत मोहिते (रा. पंचवटी, नाशिक), अनिकेत मेहरा (रा. अवनखेड, ता. दिंडोरी) हे तीन मित्र स्कुटीवरून नातेवाइकांकडे गेले होते.तेथून परतताना त्यांनी रस्त्यावर मोबाइलमध्ये काही फोटो काढले. 'लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर' असे नमूद करीत हे फोटो त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टाकले. पुढच्या काही वेळात ते स्कुटीवरून (एमएच १५/एचए ९२१२) निघाले असता त्यांची उमराळेजवळ पिकअपशी (एमएच १५/ईजी ५१०२) समोरासमोर धडक झाली. त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी मदतकार्य केले. उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, डॉ. गिरीश मोहिते यांनीही दवाखान्यात मदतकार्य केले.

घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, दिंडोरीचे हवालदार वाघ, युवराज खांडवी आदी तपास करीत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट