अनंत करमुसे मारहाण प्रकरणी अजूनपर्यंत मंत्री जितेंद्र आव्हाडांना अटक का नाही? – किरीट सोमैया
पोलिसांवर निलंबनाची कारवाई कधी होणार? ‘’राज्याचे गृहमंत्री आपल्या गुंड मित्राला बचावाचे काम करतात का? ‘’
- by Adarsh Maharashtra
- Oct 09, 2020
- 1971 views
मुंबई : इंजिनिअर अनंत करमुसे मारहाण प्रकरणी ६ महिन्यानंतरही मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक झालेली नाही तसेच ज्या तीन पोलीसांना अटक झाली होती त्यांचे सस्पेन्शन/ निलंबनाची कारवाई केव्हा होणार, FIR मध्ये मंत्र्यांचे नाव का नाही असा सवाल भाजप नेते डॉ किरीट सोमैया यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे आपल्या गुंड मित्राच्या बचावाचे काम करत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो असा आरोपही त्यांनी केला आहे.
भाजप नेते डॉ किरीट सोमैया, भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आणि ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आज याबाबत ठाणे पोलीस आय़ुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे सरकारच्या तीनही नेत्यांना आम्ही जेल मध्ये पाठवणार, तिन्ही नेत्यांनी गुंडगिरी केली आहे, मोठा भ्रष्टाचार केला आहे . मुंबईच्या महापौरांनी किशोरी पेडणेकरांनी गरीब झोपडपट्टीवासियांना अलोट झालेली गाळे हडप केले आहेत, मंत्री अनिल परबांनी मध्यमवर्गियांसाठी असलेली जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आणि तिसरे म्हणजे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या समर्धकांनी करमुसे यांना मारहाणा केल्यानंतरही अद्याप अटक झालेली का नाही ?
अनंत करमुसे या तरुणाला जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी काही महिन्यांपूर्वी अमानुष मारहाण केली होती. त्यावेळी करमुसे कुटुंबाला भेटण्यासाठी पोलिसांनी मज्जव केला होता. आता इतक्या महिन्यानंतरही यातील नक्की सूत्रधार कोण आहे हे समजू शकलेले नाही. त्याचबरोबर पोलिसांवरही निलंबनाची कोणतीच कारवाई करण्यात आली नाही, त्याचा निषेध यावेळी व्यक्त कऱण्यात आला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम