TRP साठी घरांमध्ये पैसे वाटप,रिपब्लिक TV रडारवरदोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत
- by Adarsh Maharashtra
- Oct 08, 2020
- 1162 views
मुंबई, ८ ऑक्टोबर :चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीच्या रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.
बनावट टीआरपीचे रॅकेटचा भांडाफोड मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने केला आहे. घरात विशिष्ट्य चॅनेल सुरू ठेवण्या साठी पैसे दिले जात असल्याचं संशय असून टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयां पासून पैसे देण्यात आले होते. फक्त मराठी बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल आरोपी आहेत.रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजाविण्यात येणार आहे.सहभागी असाणाऱ्या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. बँक खाते तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरु असून यात रिपब्लिक टिव्हीनेही अशाप्रकारे पैसे घेऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. अन्य चॅनेलबाबतही चौकशी सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम