
वंदेभारत अभियान,विविध देशातून मुंबईत आले १ लाख १७ हजार ४३३ नागरिक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी २०९ विमानांनी येणार प्रवासी
- by Adarsh Maharashtra
- Oct 01, 2020
- 684 views
मुंबई दि. १ : वंदेभारत अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर कालपर्यंत १०४५ विमानांनी १ लाख १७ हजार ४३३ प्रवासी दाखल झाले असून हे प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना निर्मुलनासाठी निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रा तील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेण्याचे व त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम महाराष्ट्र शासनामार्फत यशस्वीरित्या पार पाडण्यात येत आहे.
अभियानांतर्गत ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी २०९ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ३८ हजार ६०२, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ३७ हजार २०१ आणि इतर राज्यांमधील प्रवाशांची संख्या ४१ हजार ६३० इतकी आहे.या देशातून आले प्रवासी मुंबई विमानतळावर आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले असून यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान .ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथोपिया, रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलँड,सौदी अरेबिया, कॅनडा, पुर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयार्क, जॉर्जिया, कामेरून, युनायटेड अरब अमिराती, कांगो, सिरा लिओन, लिओन, इथोपिया या देशांचा समावेश आहे.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी इन्स्टिट्युशनल कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. त्यांना तेथील जिल्हाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त यांच्यामार्फत कॉरंटाईन करण्याची व्यवस्था केली जात आहे.महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन व मदत व पुनर्वसन विभागाच्या २४ मे २०२० रोजीच्या मार्गदर्शक सुचनांनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना उतरवून घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतुक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील कॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात असून संबंधित राज्यांकडून त्यांचे पासेस येताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.
वंदेभारत अभियानातील कामकाज हे जिल्हाधिकारी कार्यालय, उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ यांच्या समन्वयातून केले जात आहे.
वंदेभारत अभियायन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम