
उल्हासनगर येथे ८८ हजार रुपयाच्या मोबाईलसह आरोपी अटक .
- by Rameshwar Gawai
- Sep 30, 2020
- 595 views
उल्हासनगर (प्रतिनिधी) : उल्हासनगर शहरात मोबाईल चोरीच्या घटना मध्ये दिवसे दिवस वाढ होत चालली आहे . काल मध्यवर्ती पोलिसानी एका शातिर मोबाईल चोराला अटक केली आहे . त्याच्या कडुन पाच विवो कंपनीचे मोबाईल हस्तगत केले असुन त्या मोबाईल ची किमंत ८८ हजार ५०० रुपये इतकी आहे तर दुसऱ्या आरोपीला अटक केली असता त्याच्या कडे चोरीचे कपडे मिळुन आले आहेत .
उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे . सहायक पोलिस आयुक्त डी डी टेळे . यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर . पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते ( गुन्हे ) यांच्या आदेशाने सहायक पोलिस निरीक्षक कोकरे . सहायक उप पोलिस निरीक्षक आर डी पाटील . पो .हा . संजय सुर्वे . अरुण पाटील . दत्ता जाधव . योगेश शिंदे . प्रविण कुंभार . विनोद कामडी . गौतम सोनवणे . यानी दहिसर येथे राहणाऱ्या करण उदयसिंग ठाकुर (३०) याला सेंच्युरी मैदान डाल्फिन क्लब उल्हासनगर ३. येथुन अटक केली असुन त्याच्या जवळ विवो कंपनीचे पाच मोबाईल मिळुन आले आहेत . या मोबाईल ची किमंत ८८ हजार ५०० रुपये ऐवढी आहे तर दुसरा आरोपी अरबाज उर्फ शुटर मोहम्मद खान (२०) याला अटक केली असुन त्याच्या जवळ चोरीचे कपडे मिळुन आले आहेत . तर हे दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम