पालिकेचे यानगृह दुरावस्थेत! तातडीने दुरुस्तीचे आदेश!!

मुलुंड :(शेखर भोसले) घाटकोपर येथील पालिकेच्या यानगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यात याव्यात तसेच यानगृहाची झालेली दयनीय अवस्था सुधारण्यात यावी या मागण्यांसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सचिव अजय राऊत यांनी केलेल्या विनंतीनुसार दि २२ सप्टेंबर रोजी पालिकेच्या स्थापत्य समितीचे अध्यक्ष उपेंद्र सावंत यांनी यानगृहाची पाहणी करण्यासाठी भेट दिली. तेथील समस्येची पाहणी करून तसेच यानगृहाची दुरावस्था बघून उपेंद्र सावंत यांनी सहा. अभियंता कासारे यांस येथील सर्व समस्या व दुरावस्थेबद्दल पालिकेचे अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आदेश दिले असून पुढील एका आठवड्यात यानगृहात व येथे काम करणाऱ्या कामगारांच्या परिस्थितीत बदल न झाल्यास आपणावर कडक कारवाई करण्यात येईल अशी समज दिली. 

घाटकोपर येथील पालिकेच्या यानगृहाच्या दुरावस्थेबद्दल म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सचिव अजय राऊत यांनी स्थानिक पालिका अधिकाऱयांकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या तसेच खात्याच्या सहा अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या समवेत बैठकाही घेतल्या तरीही कामगारांची कोणतीही कामे होत नव्हती तसेच यानगृहाच्या आवाराच्या सुधारणेकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते व त्यामुळेच पालिकेच्या स्थापत्य समितीचे अध्यक्ष उपेंद्र सावंत यांना या यानगृहास भेट देण्याची विनंती बाबा कदम यांनी केली होती.

उपेंद्र सावंत यांनी दिलेल्या भेटीच्यावेळी यानगृहात एकही अभियंता उपस्थित नसल्याचे आढळून आले. यानगृहात सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडलेले आढळून आले व याच अस्वच्छ व दुर्गंधीत ठिकाणी कामगारांना काम करण्याची सक्ती केली जात होती. आवारात डासांचे साम्राज्य आढळून आले त्यामुळे कामगारांना डेंग्यू, मलेरिया होण्याची दाट शक्यता होती.अपुऱ्या लाईटच्या व्यवस्थेमुळे अंधारात काम करावे लागत होते. विजेच्या उपकरणाच्या वायरिंग उघड्यावर व लोंबकळत अवस्थेत आढळून आल्या. पिण्याच्या पाण्याची टाकी गळक्या अवस्थेत, कॉम्प्रेसर मशीन वॉरंटी कालावधीत असूनही बंद अवस्थेत, कामगारांचे लॉकर, रूम दयनीय अवस्थेत, शौचालय दुरावस्थेत, महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय नाही, या व इतर अनेक समस्या व असुविधा उपेंद्र सावंत यांच्या नजरेत पडल्याने त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून या यानगृहाची तात्काळ सुधारणा करण्यात यावी तसेच कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यात याव्या असे आदेश सहा अभियंता कासारे यांना दिले.

स्थापत्य समिती अध्यक्ष उपेंद्र सावंत यांच्या या अकस्मात भेटीच्या वेळी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, सचिव अजय राऊत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते तर पालिकेच्या वतीने सहा अभियंता कासारे, कनिष्ठ अभियंता शिंदे इत्यादी उपस्थित होते. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट