चुनाभट्टी परिसरात विभागात सर्प व घोरपडीचा सुळसुळाट ! नागरिक भयभीत!
- by Adarsh Maharashtra
- Sep 29, 2020
- 1005 views
मुंबई (जीवन तांबे)चुनाभट्टी परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून सापाचा सुळसुळाट दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चुनाभट्टी विभागातील एव्हरार्ड नगर जवळील हायवे रोड क्रॉस करताना नुकताच 10 फूटाचा अजगर तर वि .एन पूर्व मार्गावरील जोगणी गेट समोर तीन फूटाचा बॉयफर नावांचा सर्प आढळला होता.
आज चुनाभट्टी विभागातील दहा नंबर येथील सुर्वे निवास येथे चार फूटाची धामण अभिषेक सुर्वे याना दिसली तर काही अंतरावर समाजसेवक जितेंद्र जाधव यांना पाच फुटाची घोरपड दिसली असता त्यांनी सर्प मित्र प्रणित कांबळे, सिध्दार्थ गायकवाड यांना संपर्क केला असता ते घटना स्थळी येऊन धामण व घोपरडीला पकडले त्यामुळे चुनाभट्टीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.
समाजसेवक जितेंद्र जाधव यांनी सर्प मित्र सिध्दार्थ गायकवाड प्रणित कांबळे यांना सेनेटायझर मॉक्स देऊन त्यांचा सत्कार केला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम