राज्यात कोविड संदर्भात २ लाख ६९ हजार गुन्हे २८ कोटी ३१ लाख रुपयांची दंड आकारणी१०० नंबरवर १ लाख १३ हजार फोन- गृहमंत्री अनिल देशमुख
- by Adarsh Maharashtra
- Sep 26, 2020
- 466 views
मुंबई दि. २६ : लॉकडाऊन सुरू झाल्या पासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ६९ हजार गुन्हे,तसेच
१३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखलतर २८ कोटी ३१ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात दि.२२ मार्च ते २५ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,६९,६५२ गुन्हे नोंद झाले असून ३६,९४७ व्यक्तींना अटक करण्यात आली.९६,४३०वाहने जप्त केली.
यातील विविध गुन्हांसाठी २८ कोटी ३१लाख ९९ हजार २६४ रु. दंड आकारण्यात आला.
कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३६२ घटना घडल्या. त्यात ८९५ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
१०० नंबर- १ लाख १३ हजार फोन
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,१३,२४० फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,४३० वाहने जप्त करण्यात आली.
पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २१५ पोलीस व २४ अधिकारी अशा एकूण २३९ पोलिस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
नागरिकाचा सहभाग
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम