मनसेच्या दणक्याने रेल्वे वर्कशाॅपमधील,कंत्राटी कामगारांची वाचली नोकरी
- by Adarsh Maharashtra
- Sep 25, 2020
- 1214 views
मुंबई:लोअर परळ येथील रेल्वे वर्कशाॅपमध्ये करोनाकाळात काम करणा-या कंत्राटी कामगारांना अचानक काढून टाकण्याचा कंत्राटदाराने घेतलेला निर्णय मनसेच्या दणक्याने बदलावा लागला.कोणालाही कामावरून कमी केले जाणार नाही असे आश्र्वासन दिल्याने वर्कशाॅपच्या बाहेर सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
पश्चिम रेल्वेच्या लोकल परळ येथील वर्कशाॅपमध्ये हाऊस किपिंगचे काम करीत असलेल्या मराठी मुलांना रेल्वे काॅन्ट्रॅक्ट मधील बदलामुळे नवीन कंत्राटदाराने कामावरून काढण्याचे ठरविले होते कोविड-१९ काळात या मुलांनी चांगली सेवा दिली असताना देखील या मुलांना कंत्राटदाराने कामावरून काढण्याचे ठरवले होते.ही बाब मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या निदर्शनास आली. नांदगावकर यांनी मनसे उपाध्यक्ष संजय जामदार यांना याप्रकरणी लक्ष घालण्यास सांगितले. त्यानुसार पक्षाचे उपाध्यक्ष संजय जामदार मनरेका सेनेचे उपाध्यक्ष मनिष ठाकूर,मनरेगा सेना मुंबई सचिव विवेक परब,वाहतुक सेना उपाध्यक्ष विनोद कदम,माथाडी कामगार सेनेचे दशरथ निकम शाखाध्यक्ष महेंद्र परब,सर्वेश्वर ताठरे यांच्या नेतृत्त्वाखाली मनसैनिकांनी रेल्वे वर्कशाॅपवर धडक दिली.रेल्वे प्रशासन आणि कंत्राटदार यांना भेटून यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली.तेथील क़तृराटदाराला मनसेने दणका दिल्यानंतर सर्व कामगारा़ना पुन्हा कामावर घेतले आणि कोणालाही कामावरून कमी केले जाणार नाही असू आश्र्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.यावेळी सर्वथा जामदार यांच्यासोबत दशरथ निकम,विनोद कदम विवेक महाले यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी आणि आणि असंख्य मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम