वीजेच्या बिलासंदर्भात मनसेतर्फे लवकरच भांडुपमध्ये जनजागृती मोहीम
- by Adarsh Maharashtra
- Sep 25, 2020
- 1101 views
मुलुंड :(शेखर भोसले) महावितरणच्या वीज बिलामध्ये सुरु असलेला सावळागोंधळ तसेच या महिन्यात देखील ग्राहकांना पाठविण्यात आलेले वाढीव विजेचे बिल यामुळे त्रासलेल्या भांडुपकर नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना, एस विभागाचे संघटक संतोष पार्टे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी नुसार संतोष पार्टे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या एका शिष्टमंडळाने महावितरण अधिकारी नितीन सरोदे यांची गुरुवार दि २४ सप्टेंबर रोजी भेट घेतली व भांडुपकर वीज ग्राहकांच्या तक्रारी त्यांच्यासमोर मांडल्या तसेच ग्राहकांना पाठविण्यात येत असलेल्या विजेच्या बिलातील गोंधळ समजून घेण्याचा प्रयत्न केला.
महावितरण अधिकारी नितिन सरोदे यांनी मनसे पदाधिकारी संतोष पार्टे यांनी मांडलेल्या वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व कोणत्याही वीज ग्राहकांना आपले वीज बील जास्त आले आहे असे वाटत असेल तर आपण रीतसर अर्ज करून आपले मीटर मोफत तपासून घ्यावे जेणेकरून त्यात काही बिघाड असला तर आम्ही त्यानुसार वीजबिल कमी करून देऊ व न्याय देवू असे आश्वासन दिले. तसेच या भेटीच्या वेळी त्यांनी मनसे शिष्टमंडळाला वीजबिल संदर्भात सविस्तर माहिती दिली.
महावितरण अधिकाऱयांनी दिलेली विजेच्या बिलाची सविस्तर माहिती नागरिकांपर्यंत पोहचवून जनजागृती करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना, एस विभागाच्या पदाधिकाऱयांनी ठरविले असून लवकरच "जनजागृती मोहीम" राबविण्यात येईल असे जाहीर केले आहे. यावेळी संतोष पार्टे यांच्यासोबत उपप्रभाग संघटक मंगेश पास्टे, वैभव काते, राजेश आयरे, सुनील आवारी, भास्कर सावंत, काशिनाथ लब्दे, कुणाल कुमार, स्वप्नील सावंत, विशाल पिसाळ, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम