एस एस टी महाविद्यालयातर्फे परीक्षा तणावाचे निवारण'या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन.

उल्हानगर(प्रतिनिधी) : लॉकडाऊन च्या काळात 'विद्यादान' या उपक्रमांतर्गत विविध शैक्षणिक विषयांवर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन एस एस टी  महाविद्यालयाने केलेले आहे.याच शृखंलेत  सद्य परिस्थिती मध्ये विद्यार्थ्यांच्या  परिक्षे विषयीचा तणाव दूर करून परीक्षेला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन केले. यात आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त पुस्तक ' कॉर्पोरेट चाणक्य' चे लेखक,लीडरशिप कोच, कॉर्पोरेट ट्रेनर  डॉ.राधाकृष्ण पिल्लई हे प्रमुख वक्ते होते.या वेबिनार मध्ये त्यांनी विद्यार्थ्याना  परिक्षेचा तणाव दूर करण्यासाठी अतिशय सोप्या शब्दात विविध उपाय सांगितले.विद्यार्थ्यानी  परिक्षेकडे एखाद्या खेळाप्रमाणे बघावे,आपले विचार सकारात्मक ठेवावेत तसेच व्यायाम आणि ध्यान करावे असे सांगितले सोबतच 3P, पॉसिटीव्हीटी,प्रॅक्टिस,प्रेयर हा कानमंत्र ही दिला.या वेबिनारचा लाभ भारतातील विविध राज्यामधील ३०००  पेक्षा जास्त विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी घेतला वेबिनार अतिशय उपयुक्त,प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रिया पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिल्या.

अशा प्रकारचे  वेबिनार भविष्यातही आयोजित करण्याचा  मानस एस एस टी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ पुरस्वानी यांनी व्यक्त केला आहे .

संबंधित पोस्ट