राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस,निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह
- by Adarsh Maharashtra
- Sep 22, 2020
- 620 views
मुंबई : संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जबरदस्त खडाजंगी सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे.ही नोटीस, गेल्या निवडणुकांत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात आहे.
'मला सोमवारी नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर आपण लवकरच देऊ. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रां संदर्भात ही नोटीस आहे,' असेही शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या भाजपा आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाकडून या नोटिशीत निवडणूक काळात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती मागवली आहे.
पवारांचा उपवास
संसदेत नुकतीच कृषी विधेयके मंजूर झाली. या विधेयकांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत आहे. आजच यासंदर्भात शरद पवारांनी एक दिवसाचा उपवास ठेवणार असल्याचे म्हटले होते, अशातच या नोटिशीचे वृत्त आले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम