
इमारती कोसळतात, नि:ष्पाप जीव जातात,राजकारणी अश्रू ढाळतात,यंत्रणेवर खापर फोडतात.
- by Adarsh Maharashtra
- Sep 22, 2020
- 1116 views
मुंबई(प्रतिनिधी) - इमारती कोसळतात,जीव जातात तेवढया पुरते शासन-प्रशासन गळे काढतात.सरकारी तिजोरीतून अपघातग्रस्तांना आर्थिक मदतीची घोषणा होते,जसे काही आपल्याच खिशातून मदत जाहीर केली अशा थाटात राजकारणी मिडियासमोर सुतकी चेहरे दाखवत प्रसिद्धी करून घेतात,हे चित्र आता सर्वसामान्यांना चीड आणणारे झाले आहे, अशी खंत डिग्नीटी फौंडेशन एक्सलेन्सी पुरस्काराने सन्मानित समाजसेवक दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
शहरात होणारी इमारत पडझडी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी आता पुन्हा नव्याने कागदी घोडे नाचवत आहेत.काही वर्षांपूर्वी वांदरे येथील नाल्यावर बांधलेल्या गोविंद टॉवर पडझडीनंतर हा सिलसिला अव्याहत पणे सुरू आहे. मुंबईत सन २०१९ ला डोंगरीत इमारत कोसळली,१३ठार.सन २०१७ ला घाटकोपर सिध्दीसाई इमारत कोसळली,१७ ठार. मे२०२० ला कांदिवली (प.) दाजीपाडा येथे इमारत कोसळली,८जून २०२० ला कुरला येथे,१८ जून २०२० ला जोगेश्वरीत,१५जुलै २०२० ग्रँटरोड,१६ जुलै २०२० फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळून ९ ठार,२१ सप्टेंबर २०२० भिवंडीत जिलानी इमारत कोसळली.नागपाडयात मिश्रा इमारत कोसळली;डोंगरीत २/९/२०२० रोजी रझाक इमारत कोसळली.महाडला इमारत कोसळली आगी लागणे ह्या नित्याच्या बाबी झाल्याचे मत शिरवडकर यांनी व्यक्त केले.
मुर्दाड यंत्रणेमुळे अपघात घडतात; कारण बांधकाम व्यवसायाचा कोणताही अनुभव नसलेले धनको आज समाजात बिल्डर म्हणून वावरत आहेत. इमारतीची सजावट चांगली पण बांधकाम दर्जाहीन.बांधकामात वापरले जाणारे साहित्य दुय्यम दर्जाचे व दर्जाहीन असते.अकुशल कामगार, कामावर सक्षमपणे देखरेख नाही. हवामानाचा कोणताही अंदाज न घेता बांधकाम,इमारतीतील गळतीकडे दुर्लक्ष, केवळ पावसाळ्यात प्रशासनाकडून पाहणी आणि नोटीसा काढण्याची औपचारिकता केली जाते.स्ट्रक्चर ऑडिट फायर ऑडिटकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव,बेकायदा बांधकामांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नागरी सुविधा ,मुद्रांक शुल्क वसुली व सहकारी संस्था विभाकडून हौसिंग सोसायटी नोंदणीचे प्रताप केले जातात,व अशा नस्ती कार्यालयातून गायबही केल्या जातात. शासनाचा कोणताही अंकुश प्रशासनावर नाही.तर जनतेत बेफिकीरपणा या साऱ्याचे परिणाम इमारत कोसळण्या करता कारणीभूत ठरतात.त्यातच प्रशासकीय यंत्रणा लक्ष्मीबंधनात अडकलेली.अपघात घडल्यानंतर अश्रु ढाळणारे राजकारणी पडद्याआडून मात्र बेकायदा बांधकामाच्या दर्जाहीन कामाच्या पाठीशी असतात हे कटु सत्य आहे. शेवटी सारे खापर प्रशासनावर व जनतेवर मारले जाते अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली
राजकारणी थयथयाट करतात.आरोप-प्रत्यारोप करतात,सरकारी पैशातून बैठका होतात.आदेश निघतात,परंतु कोणतीच अम्मलबजावणी होत नाही.त्या त्या वेळचे मुख्यमंत्री चौकशीचे केवळ आदेश देतात,पण फिरून दिलेल्या आदेशाचे काय झाले हे पहातात काय?जनताही हे सारे विसरून जाते अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
आता निश्चित धोरण बनविण्यासाठी बैठका घेतल्या जातील. मग याआधी पडझडीनंतर निश्चित धोरण ठरले नव्हते काय?असा प्रश्न पडतो.आज मुंबई पालिका क्षेत्रात अंदाजे १६ हजाराहून अधिक धोकादायक इमारती आहेत. मध्यंतरी पालिकेतून कित्येक इमारतीच्या नस्ती गहाळ झाल्याचे प्रकरण बरेच गाजले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शहरात कित्येक जुन्या इमारतींवर नव्याने इमले चढले आहेत. याकडे कोणाचे दुर्लक्ष होत आहे,कोणाचा दबाव आहे?यावर मात्र कोणीच भाष्य करीत नाही अशी खंत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे आज मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. हाच कळीचा मुद्दा आहे.या साऱ्यांची सक्षम तपास यंत्रणांकडून चौकशी झाल्यास बरेच भूकंप होतील.नवनियुक्त महाविकास आघाडी सरकारने सर्वप्रथम प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार, कामचुकारपणा दूर करण्याकरता सक्षम प्रयत्न केले पाहिजेत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.असे परखड विचार दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम