मुंबईत कोरोना रुग्ण वाढतायत,हे उघडा,ते उघडा म्हणणारे जबाबदारी घेणार काय?
- by Adarsh Maharashtra
- Sep 22, 2020
- 630 views
मुंबई : आज मुंबईत आटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. सप्टेंबरमध्ये ८० टक्के कोरोना रुग्ण वाढले असून ही संख्या दिवसागणिक एक हजाराचे वर वाढत आहे. चित्रिकरणाच्या वेळी गुणी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली व त्यात त्यांचा मृत्यू झाला,अन्य काही कलाकार कोरोनाग्रस्त झाले आहेत. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे रयतेच्या भल्याचे निर्णय घेत असताना प्रसिद्धीसाठी चढाओढ करणारे "हे उघडा,ते उघडा" असा पब्लिसिटी स्टंट करीत आहेत. चित्रीकरणा दरम्यान गुणी अभिनेत्रीचे निधन कोरोनामुळे झाले; चित्रिकरणाला परवानगी द्या म्हणणारे आता कुठे आहेत?प्रसिद्धी माध्यमानी पब्लिसिटी स्टंट करणाऱ्यांना वारेमाप प्रसिद्धी न देता जनतेच्या भल्यासाठी कार्यरत असणाऱ्यांना प्रसिद्धी द्यावी.
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी,सत्तेसाठी सर्वसामान्यांची माथी भडकवून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेस वेठीस धरणाऱ्यांपासून सर्वसामान्यांनी खास करून युवकांनी स्वतःच्या जीवासाठी सावध रहाणे गरजेचे आहे. असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांनकडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी केले
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम