
उल्हासनगर अंबरनाथ येथे मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन .
- by Rameshwar Gawai
- Sep 21, 2020
- 1594 views
लॉक डाऊन काळात लोकल सेवा बंद केलेली असुन शासकिय व अत्यावश्यक सेवे करिता लोकल सुरु आहेत . परंतु या लोकल सेवेत रुग्ण . सर्व सामान्य नागरिक आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्याना परवानगी नाही . त्यामुळे मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने उल्हासनगर अंबरनाथ येथिल मनसैनिकानी अंबरनाथ रेल्वे स्थानकात जावुन लोकल ने प्रवास करुन सविनय कायदेभंग आंदोलन करुन लवकरात लवकर लोकल सेवा सुरु करा अशी मांगणी केली आहे .
देशात राज्यात व शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकल सेवा बंद केली आहे . त्यामुळे सर्व सामान्य नागरिक पुर्णता बर्बाद झाला आहे . तर शासनाने शासकिय कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या करिता लोकल सेवा सुरु केली आहे . परंतु मुंबईला जाणारे रुग्ण आणि खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी व सर्व सामान्य नागरिक याना लोकलने जान्यास मुभा नसल्याने सर्वच ठप्प झाले आहे म्हणुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी लोकल सेवा सुरु करन्याची मांगणी शासना कडे केली परंतु या मांगणी कडे शासने दुर्लक्ष केले आहे . तेव्हा मनसेच्या वतीने लोकल ने प्रवास करन्या करिता जन आंदोलन करन्याचे आदेश राज ठाकरे यानी दिले होते . तेव्हा उल्हासनगर मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देखमुख मनविसे चे अध्यक्ष मनोज शेलार यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ रेल्वे स्थानकात जावुन सर्व मनसैनिकानी लोकल ने प्रवास करन्याचा प्रयत्न करुन सविनय कायदेभंग आंदोलन केले . तेव्हा अंबरनाथ पोलिसानी या सर्व मनसैनिकाना अटक करुन नंतर सोडुन देन्यात आले आहे . लोकल ला उल्हासनगर थांबा नसल्याने अंबरनाथ रेल्वे स्थानकात आंदोलन करन्यात आले असुन लवकरात लवकर लोकल सेवा सुरु करा अशी मांगणी बंडु देशमुख यानी केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम