भिम आर्मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिमपँथर राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली खाजगिकरणाविरोधात राष्ट्रपतींना निवेदन देणार : कुमारभाई पंजवाणी

मुंबई :(प्रतिनिधी) केंद्र सरकारने एअर इंडिया , रेल्वे , LIC सह अजून बरेच काही विक्रीला काढले असून ह्या सरकारी क्षेत्रात सातत्याने होत असणाऱ्या खाजगिकरणा विरोधात आणि इतर खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्यात यावे ह्या मागणीसाठी २४ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात संविधान रक्षक , आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद आणि भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मवीर भाई विनय रतन सिंह जींच्या आदेशानुसार  भिम आर्मी आणि आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भारताच्या सन्माननीय राष्ट्रपतींना हजारोंच्या संख्येने निवेदने देण्यात येणार असून महाराष्ट्रात सुद्धा केंद्रीय नेते अशोकभाऊ कांबळे , राज्य कोअर कमिटी प्रमुख राजूभाई झनके , राज्यप्रमुख नेहाताई शिंदे आणि राज्य मुख्य महासचिव मनिषभाई साठे यांच्या सूचनेनुसार निवेदनांच्या माध्यमातून खाजगिकरणाविरोधात कार्यकर्ते  आपला रोष प्रकट करणार आहे.

भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख आणि कार्यकारी ठाणे जिल्हाप्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती उल्हासनगर शहरप्रमुख कुमारभाई पंजवाणी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.सदरहू निवेदन देतेवेळी मिलिंदजी बेळमकर , शशिभाई जगत्यानी , रमाताई कांबळे , मायाताई कांबळे , रविंद्रजी साळवे , दिपराज सरदार ,  अण्णासाहेब कांबळे, प्रदीपभाई तोतलानी , गोपीभाई वाधवानी , किसनभाई ओव्हाळ , समिरभाऊ मर्चंडे , जितेंद्र भोसले , पप्पूभाई आखाडे , जीवनजी सुरडकर , नानासाहेब वानखेडे , अनिलभाऊ महाजन , पुजाताई भोसले , ज्येष्ठ पत्रकार सुखनंदन गवई , सलीमभाई मंसुरी , किरण तेलगोटे आणि इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती कुमारभाई पंजवाणी यांनी दिली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट