अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संंस्थेचा एक हात मदतीचा रुग्णसेवेचा अभिनव उपक्रम.

मुंबई :अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान  संस्था गेली ११ वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत काम करीत आहे . तसेच संस्थेमार्फत मागील ११ वर्षांत शैक्षणिक उपक्रमांतर्गत १७ हजार मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.अक्षरा संस्थेस महाराष्ट्र शासन, रिलायन्स , मानवता हॉस्पिटल (नाशिक) व   अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या कठीण  परिस्थितीतही मुंबई व पुणे येथील  रुग्णालयात मोठया आजारांवर  उपचार घेत असलेल्या लहान मुलांचे पैशांअभावी उपचार थांबू नयेत यासाठी निधी उभारत आहे. संस्थेने मागील तीन वर्षात २७ ते २८ आजारी मुलासाठी १४ ते १५ लाखांचा निधी उभारत  सामाजिक बांधिलकी जपली आहे. आणि हे सर्व फक्त संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत असलेल्या लोकसहभगातून शक्य होत आहे. समाजहीताचे कार्य अखंडपणे सुरू राहण्यासाठी तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. लाॅकडाउनच्या या परिस्थितीमध्ये आपणही  अशाप्रकारचे सहकार्य आमच्या संस्थेला करू शकता.आपण जर या उपक्रमास सहकार्य करू इच्छित असाल तर कृपया आपण आपली मदत थेट संस्थेच्या वेबसाईटला http://www.aksharasp.org.in भेट देऊन करू शकता जेणेकरून आपणास ८० G certificate मिळू शकेल.

संबंधित पोस्ट