
दि. २२ व २३ सप्टेंबर रोजी अंधेरी, गोरेगांव व जोगेश्वरीतील काही भागांत पाणीकपात
मेट्रो रेल्वेच्या कामासाठी जलवाहिनी वळविण्याच्या कामाकरिता पाणीकपात नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन
- by Reporter
- Sep 18, 2020
- 1916 views
मुंबई (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात एम.एम.आर.डी.ए. च्या पुढाकाराने अनेक ठिकाणी मेट्रो रेल्वेची कामे सुरु आहेत. याच मेट्रो रेल्वेच्या कामासाठी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील पिलर नं.१५५ ते १५६ दरम्यान असणारी १२०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी वळविण्याचे काम दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे ४.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सदर कालावधीत म्हणजेच दिनांक २२ सप्टेंबर २०२० व दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी ‘के पश्चिम’, ‘के पूर्व’ व ‘पी दक्षिण’ या तीन विभागातील काही
परिसरांमध्ये पाणी कपात होण्यासह पाणीपुरवठय़ाच्या वेळेतही तात्पुरता बदल करण्यात येणार आहे. तसेच यामुळे सदर परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. ही बाब लक्षात घेऊन संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरत बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.
जलवाहिनी वळविण्याच्या कामासाठी ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठय़ाच्या वेळेत बदल करण्यात येत आहे, त्याबद्दलची माहिती खाली नमूद केलेल्या तक्त्याप्रमाणे आहे.
(तर तक्त्यासाठी कृपया ई-मेल चेक करावे, ही विनंती)
के/पश्चिम, के/पूर्व व पी/दक्षिण विभागातील वर नमूद केलेल्या परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येते की, सदर वेळेतील कपात व बदल हे दिनांक २२ सप्टेंबर २०२० व दिनांक २३ सप्टेंबर २०२०; या दोन दिवसांकरिता तात्पुरत्या स्वरुपात आहेत, याची कृपया नोंद घेण्यात यावी.
रिपोर्टर