
सेवा सप्ताह अंतर्गत प्रभाग क्र १०६ येथे सोसायटयांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे मोफत वाटप
- by Reporter
- Sep 18, 2020
- 475 views
मुलुंड (शेखर भोसले) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या जन्म दिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवा सप्ताह अंतर्गत प्रभाग क्र १०६ तील ७० सोसायट्यांना थर्मल गन व ऑक्सिमीटरचे वाटप भाजपा गटनेते, नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते गुरुवार दि १७ सप्टेंबर रोजी
मुलुंड पूर्वच्या वासुदेव बळवंत फडके रोड येथील कार्यालयात करण्यात आले. यावेळी भाजपाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या या कार्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
रिपोर्टर