गरजू नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुलुंड (शेखर भोसले) : शिवसेना कांजूर विभागाच्या वतीने कार्यकर्त्या दिपाली दिलीप पाटील यांच्या सौजन्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागातील गोरगरीब, गरजू नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते शुक्रवार दि १७ सप्टेंबर रोजी कांजूरमार्ग येथे करण्यात आले. सदर प्रसंगी उपविभाग प्रमुख अनंत पाताडे, सिद्धी जाधव, संदीप सावंत, योगेश पेडणेकर, भारती शिंगटे, रविंद्र महाडिक, प्रतिभा राणे, बाबू ठाकूर, उर्मिला लोके, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित पोस्ट