
जनता केंद्र अध्यक्ष तुकाराम मांजवकर यांचे दु:खद निधन
- by Reporter
- Sep 18, 2020
- 930 views
मुंबई (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक, क्षेत्रात ६७ वर्षे वाटचाल करीत असलेल्या ताडदेव जनता केंद्र या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ,जेष्ठ समाजसेवक तुकाराम मांजवाकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आजाराने दुःखद निधन झाले. तुकाराम मांजवाकर ताडदेव अपना बाजार चे व्यवस्थापक समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते.राष्ट्र सेवा दल, प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि दक्षिण मुंबईतील
साथी नारायण तावडे आणि साथी शांताराम तावडे यांचे विश्वासू समर्थक होते.ताडदेव विभागातील जनता केंद्र परिवारात स्थापनेपासून सदैव कार्यरत असलेले असे एक महान व्यक्तीमत्व हरपले. त्यांच्या
जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या विभागातील सर्व स्तरातील लोकांना शोक अनावर झाला. मुंबईतील राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तुकाराम मांजवाकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
रिपोर्टर