हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमाकेअर हॉस्पिटलमधील बाळासाहेब ठाकरे रक्तपेढी मध्ये कोविड रुग्णांसाठी प्लाझ्मा संकलन सुरू.

बाळासाहेब ठाकरे रक्तपेढीस कोविड-१९ आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा संकलन करण्याचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून प्राप्त झाला आहे.

कोविड -१९ आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूच्या विरुद्ध प्रतिजैविके (अँटीबॉडीस) तयार होतात. ह्या बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जर कोविड -१९ च्या रुग्णांना दिल्यास ही

प्रतिजैविके त्या रुग्णाचा प्राण वाचविण्यात महत्वाची ठरतात. ह्या प्लाझ्मा संकलनासाठी अन्न व औषध प्रशासनाची (FDA) मान्यता लागते.अन्न व औषध प्रशासनाने रक्तपेढीस लवकरात लवकर मान्यता दिली हे प्लाझ्मा संकलन अफेरेसिस प्रणालीने केले जाते.

कोविड -१९ आजारातून बरा होऊन ज्या रुग्णास २८ दिवस झालेले आहे किंवा ज्या रुग्णास १४ दिवस झालेले आहे व ज्यांचे दोन स्वाब RTPCR टेस्टने निगेटीव्ह आलेले आहेत अशी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते व तो प्लाझ्मा कोविड रुग्णास देऊन त्याचे प्राण वाचू शकतात. असे बरे झालेले कोविड रुग्ण रक्तपेढीचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चंद्रहास ९१६७४५९७४२ व गजानन दिवटे- ८८७९६६२५०८ या क्रमांकावर संपर्क करून प्लाझ्मा दान करू शकतात. अशा जास्तीत जास्त रुग्णांनी समोर येऊन या जीवनदानाच्या कार्यात सहकार्य करावे असे रक्तपेढीतर्फे आम्ही आवाहन करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट