
रशियन लसीच्या डोसाने शरीरात होतायत साईड इफेक्ट
- by Reporter
- Sep 17, 2020
- 470 views
मुंबई (प्रतिनिधी) : जगभर कोरोनाने हाहाकार माजवला असून कोरोनाबधितांची संख्या कोटींमध्ये पोहचली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्यात मग्न आहेत. नुकतीच रशियाने आपली लस लॉन्च केली होती. मात्र याच लसीबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे
रशियन लस ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा डोस घेतल्यानंतर दर सातपैकी एका स्वयंसेवकामध्ये साइड इफेक्ट आढळून आले आहे, अशी माहिती रशियाचे आरोग्य मंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली. अशक्तपणा, स्नायूंमध्ये वेदना असे या साइड इफेक्टचे स्वरुप होते
जवळपास १४ टक्के लोकांनी अशक्तपणा आणि स्नायुंमध्ये वेदनेची तक्रार केली. २४ तासांसाठी त्यांना हा त्रास जाणवला तसेच शरीराचे तपामान सुद्धा वाढले
स्पुटनिक व्ही’ लसीचे पहिल्या दोन पहिल्या दोन फेजमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांवर कुठलेही गंभीर साइडइफेक्ट आढळून आले नाहीत तसेच सर्व स्वयंसेवकांच्या शरीरात कोरोना विरोधात
लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असे लॅन्सेटच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते. सध्या हजारो स्वयंसेवकांवर ‘स्पुटनिक व्ही’ लसीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे.
दरम्यान ही लस आता भारतात उपलब्ध होणार आहे. रशियाने डॉ. रेड्डी लॅबोरटरीज बरोबर करार केला आहे. डॉ. रेड्डी लॅबला रशिया ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे ट्रायल म्हणजे चाचणी आणि वितरणासाठी १० कोटी डोस देणार आहे.
रिपोर्टर