
नरेंद्र मोदींच्या यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्हा च्या वतीने दिव्यांगाना सायकल व किट वाटप.
- by Reporter
- Sep 17, 2020
- 950 views
मुंबई (जीवन तांबे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई मध्य मुंबई च्या वतीने सेवा सप्ताह कार्यक्रम आज वसंत स्मुर्ती कार्यालयात घेण्यात आला यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांनी
विकलगांना अपंग समजू नका! त्यांना दिव्यांग म्हणा! सर्वांनी चागले व्रत करत रहा असे असा मोलाचा सल्ला दिला.
मुंबई महापालिक निवडणूक स्वबळावर लढणार आणि ११२ च्या वर जागा निवडून आणू तसेच महाभकास आघाडी चा मुख्यमंत्री गेली ६ महिने घरी बसून आहेत मराठ्यांच्या बाबतीत सरकार ती निष्क्रिय ठरलीय अशी टीका राज्य सरकारवर प्रसाद लाड यांनी केली.
यावेळी एकूण ७० दिव्यागांना सायकल वाटप, सेफ्टी किट देवेंद्र फडणवीस व भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार कॅप्टन सेलवन, आमदार कालिदास कोलंबकर व दक्षिण मध्य मुंबई जिल्हाच्या कामकाजाचे ई पुस्तकाचे प्रकाशन ही त्याच्या हस्ते करण्यात आले व एक लाख रुपयाचा धनादेश संत गाडगे महाराज ट्रस्टसचे अध्यक्ष प्रशांत देशमुख यांना देण्यात आला यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोलंबकर,आशिष गडकरी, कॅप्टन सेलवन, राजेश शिरवाडकर, अनेक नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
रिपोर्टर