कोरोना संकटामुळे ६३ वा कामगार शिक्षण दिन ऑन लाईनद्वारे संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय कामगार शिक्षण संस्था मुंबई, दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड (श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) यांच्या विद्यमाने १६ सप्टेंबर २०२० रोजी ६३ वा " कामगार शिक्षण दिन" कोरोना संकटामुळे ऑनलाईनद्वारे संपन्न झाला.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त श्री. सुधाकर अपराज यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक व  प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना सांगितले की, कोव्हिड १९ मुळे कामगार हा घटक प्रभावित झाला आहे. त्याला कामगार शिक्षणाद्वारे जागरूक केले पाहिजे. महाराष्ट्र राज्य, मुंबईचे अतिरिक्त कामगार आयुक्त श्री. अश्विन काटकर यांनी  विशेष पाहुणे म्हणून भाषण करताना स्थलांतरित कामगारांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली. या योजनांचा बांधकाम क्षेत्रातील सर्वच असंघटित कामगारांना फायदा मिळाला नाही, याची खंत व्यक्त केली. कामगार शिक्षण अधिकारी डॉ. अस्मिता  देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी कामगार शिक्षण केंद्राचे उपसंचालक (प्रभारी) रमेश मजवी, सत्यशोधक कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर तायडे, घरेलू कामगार महिला संघ, बी. एम. एस. चे रघुवीर कोरगावकर, श्रमिक राज संघटनेचे देविदास पंडागळे, खदान कामगार संघटनेचे झामा,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मारुती विश्वासराव, विकास नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार शिक्षक बाळकृष्ण लोहोटे, सुनील अहिरे, परेश चिटणीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित पोस्ट