महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेना आता डमी केबल चालकांच्या विरोधात मैदानात.

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेकडे मागील काही दिवसांपासून डमी केबल चालकांच्या बाबतीत (अधिकृत केबल चालकांच्या व्यवसायिक विभागात अनधिकृतपणे शिरकाव करून व्यवसाय करणारे) वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी मुंबई शहरातुन येत होत्या.

यांच विषयावर अधिकृत केबल चालकांच्या धारावी येथील नवीन S.R.A टॉवर्स चा पोस्ट परवाना असताना देखील एक डमी केबल चालक  एका M.S.O  ला  व लबाड सोसायटी मेंबर्स ना हाताशी धरून त्या S.R.A टॉवर्स मध्ये शिरकाव करत होता, अशी तक्रार मनसे केबल सेने कडे आली होती.

आता सविस्तर पणे, धारावी येथील आकाश टॉवर्स या नव्या S.R.A टॉवर्स मध्ये अधिकृत केबल चालक श्री. बाळा थेवर आणि श्री. अरसंन  दोघा कडे गेले 25 वर्ष पोस्ट परवाना असून देखील या केबल इंडिस्ट्री तिल नामाकित M.S.O  इन केबल ग्रुप त्या ठिकाणी डमी केबल चालकांच्या पाठीशी उभे राहत असलेल्या ची

अशी तक्रार  अधिकृत केबल चालक श्री. बाळा थेवर आणि श्री. अरसंन यांच्या कडून मनसे केबल सेने कडे आली होती.

यांच प्राश्वभूमीवर आज मनसे केबल सेने कडून नामाकित M.S.O  इन केबल ग्रुप च्या मुंबई तिल अंधेरी येथील मुख्य कार्यालयात इन केबल ग्रुप चे अधिकारी श्री. रुस भेट घेतली. या भेटीत इन केबल ग्रुप चे अधिकारी श्री. रुस यांना धारावी येथील आकाश टॉवर्स या नव्या S.R.A टॉवर्स मध्ये डमी केबल चालकाला आपली लाईन न देता अधिकृत केबल चालक श्री. बाळा थेवर आणि श्री. अरसंन यांना

अधिकृतपणे देण्यात यावी अशी समज देण्यात आली व आपण सर्व M.S.O बंधूनी केबल इंडिस्ट्री काही नियम व तत्व पाळावी हे देखील या वेळी सांगण्यात आले.

या वेळी उपाध्यक्ष श्री. मुकेश मल्होत्रा, श्री.राजेश जैन  ,श्री. जगदीश जोशी,  श्री. विधाधर बने ,श्री. अब्दुल माजिद, श्री. गणेश देवेन्द्र चिटणीस श्री. प्रकाश शेट्टी व श्री. कुणाल साळुंके या सर्वांनी मनसे केबल सेनेच्या वतीने इन केबल ग्रुप च्या मुख्य कार्यालयात धडक दिली.

या पुढे कोणत्याही M.S.O ( बहुविध यंत्रणा चालक) यांनी डमी केबल चालकांना आपली केबल लाईन देईल, या सर्वांना मनसे केबल सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

संबंधित पोस्ट