मुंबई महापौरांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात तक्रार
- by Reporter
- Sep 17, 2020
- 524 views
मुंबई (प्रतिनिधी) : आज भाजप नेते डॉ. किरीट सोमैया यांनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली. महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात खालील बाबींविरोधात तक्रार दाखल केली.
१) भ्रष्ट कारभार, खोटी आणि चुकीची माहिती दिशाभूल करणारी विधानं/स्टेटमेंटस् घरगुती आणि व्यवसायिक जागेबाबात चुकीची माहिती.
२) अवैध आणि भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप, गरीब झोपडपट्टीवासियांसाठी राखीव असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरणाची जागा ( SRA )ची जागा अवैधरित्या बळकावली.
३) महापौरपदाचा गैरवापर करत महापालिका, झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण आणि सरकारी प्राधिकरणांकडून कंत्राट मिळवली, आर्थिक लाभ.
४) महापौर पदाचा स्वत:साठी आणि कुटुंबियांसाठी गैरवापर करुन घेतला.
५) सरकारी आणि रजिस्टर कंपनी कार्यालयांकडे चुकीची माहिती सादर केली.
६) निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आणि रजिस्टर कंपनी कार्यालयाकडे चुकीची माहिती जमा केली. तसेच आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत.
७) डॉ. किरीट सोमैया यांनी श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरोधातील कागदपत्रेही जमा केली आहेत.
१) गोमती जनता एसआरए सोसायटी/प्रकल्पातील झोपडपट्टीवासियांसाठी असलेली राखीव जागा बळकावली.
२) किश कॉर्पोरेट सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे रजिस्टर असून, ही कंपनी तळमजला, बिल्डिंग क्रमांक १ गोमती जनता एसआरए सोसायटी या पत्त्यावर रजिस्टर आहे. ही जागा कुटुंबियांच्या मालकीची नसून ते सोसायटीचे वेलफेअर ऑफिस आहे.
८) त्याचबरोबर या SRA सोसायटीतील सुरुवातीपासून म्हणजेच सुमारे १२ वर्षापासून एक फ्लॅटही बळकावला आहे.
९) याबाबत त्यांनी जाहीर स्टेटमेंट प्रसिध्द केले आहे की, सदर दोन्ही जागांसाठी मालकाला भाडं देत आहे. आणि त्याचा करारनामा आहे.
१०) SRA कायद्यांतर्गत हे गैर आहे. हे कायदेशीर नाही.
११) अशा प्रकारची कागदपत्रे आणि करारनामा त्यांनी कोणत्याही सरकारी कार्यालयाकडे जमा केलेला नाही.
१२) मुंबई महापालिका आणि SRA प्राधिकरणाला अशा प्रकारे उल्लंघन केलेल्याची माहिती असतानाही त्यांनी महापौर किंवा त्यांच्या कुटुंबियांविरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही.
१३) किश कॉर्पोरेटस् सर्विसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची रजिस्टर ऑफ कंपनीज कडे नोंदवलेली कागदपत्रे अपूर्ण/अर्धवट आहेत.
१४) महापौर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपनीला मुंबई महापालिकेचे कंत्राट मिळतात हे या आधाही सिध्द झालं आहे.
डॉ. किरीट सोमैया यांनी महापौरांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.
रिपोर्टर