महाराष्ट्र व्देष्ठयांना वेळीच आवरा!

मुंबई (दीपक शिरवडकर) : भारतीय संविधानानुसार देशात संघराज्य, राजकीय रचना व भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आहे. तसेच देशातील कोणालाही कोठेही जाऊन राहण्याचा अधिकार आहे; परंतु त्या त्या ठिकाणच्या भुमिपुत्रांवर अन्याय करण्याचा अधिकार नाही.अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण कोणावरही विनाकारण चिखलफेक होता कामा नये, एक दुसऱ्याचा मान हा राखलाच पाहिजे.तसेच गुजराथी लोकांसाठी गुजराथ,कन्नडिंना कर्नाटक,तामिळींना तामिळ तसे मराठी लोंकाना महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे.असे असताना महाराष्ट्र स्थापनेपासूनच महाराष्ट्र द्रोह,

मुंबईद्रोह,पहायला मिळत आहे. काही भांडवलदार काही हितसंबधीत पत्रकारांना, वृत्तवाहिन्यांना हाताशी धरून व अन्य प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून डिजिटल युगात मुंबईसह महाराष्ट्राची,मुंबई

पोलिसांची,मुंबई पालिकेची राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अन्य जेष्ठांची बदनामी करण्याचे कारस्थान करताना दिसतात आणि त्याला आपलेच काही मराठी व्देष्ठे खतपाणी घालतात हे पाहून दु:ख होते काही राजकारणी,प्रवक्ते हिंदी-इंग्रजी वृत्तवाहिन्या महाराष्ट्र व्देषाचे जे बीज पेरत आहेत आणि हे महाराष्ट्र व्देष्ठे कोण आहेत हेही लोकांच्या लक्षात आले असताही स्वाभिमानी मराठी माणूस अशांची तळी उचलत आहे हे पाहून अधिकच दु:ख होते. सत्तेसाठी एका नटाच्या मृत्यूचे भांडवल करणारे नको ती गरळ ओकणाऱ्या एका नटीची पाठराखण करणारे,राज्याच्या मुख्यमंत्र्यां विरोधात आक्षेपार्ह पोष्ट करणाऱ्या माजी सैनिकाची भलावण करणारे,त्याच्यासाठी कोर्टात जाण्याची भाषा करणारे शेतकरी आत्महत्या, महिला शोषण, बेकारी,भाववाढ आदी समस्यांबाबत मात्र कोर्टात जाण्याची भाषा करीत नाहीत. सागरी रस्त्यासाठी उपनगरात किनाऱ्यावरील साडेपाच कि.मी मँनग्रोव्ह गाडला जाणार आहे. जवळजवळ १११ एकर भराव टाकला जाणार आहे.समुद्रकिनारी भिंत बांधण्याचा घाट घातला जात आहे. सागरी रस्ता विरारपर्यंतच्या चौपाटया नष्ट करू शकतो.तसेच बेस्टला,रेल्वेला मोडीत काढण्याचा घाट आहे.सरकारी कंपन्यांचे खासगीकरण,आर्थिक घसरण याविरोधात कोर्टात जाण्याचे धाडस कोणी करत नाही
        
बिल्डरांकडून,शासकीय यंत्रणांकडून सर्वसामान्यांची जी फसवणूक होते,मल्टिलेवल कंपन्या फसवणूक करीत आहेत,बनावट कागदपत्राने बँका कर्जे वितरीत करत आहेत, सेवायोजन कार्यालयाचे तीन तेरा वाजले आहेत. कामगार कपात केली जात आहे, याबाबत एकही राजकारणी ब्र काढताना दिसत नाही. केवळ सुशांत, रिया,कंगना,शर्मा राज्यापुढील समस्या आहेत काय?
        
२० जवानांच्या हौतात्म्यानंतर चौथ्याच दिवशी भारताने चीनकडून ५५१४ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले,आणि ही माहिती सरकारच संसदेत सांगते.यावर कोणीही बोलत नाही.यालाच राष्ट्राभिमान,लोककल्याण म्हणायचे काय?

दीपक शिरवडकर . बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित . कायदेविषयक सल्लागार . डोंगरी सार्व समाजसेवा प्रतिष्ठान रजिस्टर . डेग्निटी फौंडेशन एक्सलिन्सी पुरस्कार गणसेवक पुरस्कार

संबंधित पोस्ट