भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी खुले करा- मनसेची मागणी .

उल्हासनगर(प्रतिनिधी) : उल्हासनगर महानगर पालिकेने उभारलेले   भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी खुले  करण्यात यावे  अशी मांगणी  मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख व मनविसे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांनी महापालिका आयुक्त डॉ . राजा  दयानिधी व महापौर लिलाबाई आशान यांच्याकडे केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने  काही महिन्या  पासून या अभ्यास केंद्राला  कोविड केअर सेंन्टर करण्यात आले आहे  . परंतु आता आपल्या शहरातील रुग्ण संख्या बऱ्या पैकी आटोक्यात आली असून सध्या या अभ्यासिकेत एकही रुग्ण नाही.व ही अभ्यासिका कोविड सेंन्टरसाठी दिल्यामुळे यु.पी.एस.सी.  व  एम.पी.  एस.सी.   तसेच ईतर स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे   जागे अभावी प्रचंड हाल होत असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांना होणाऱ्या  असुविधेचा व त्यांच्या शिक्षणाचा विचार करुन ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना अभ्यासा साठी तात्काळ खुली करुन दयावी अशी मागणी बंडू देशमुख यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट