
भांडुपला टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी! दुचाकीचे मोठया प्रमाणात नुकसान
- by Reporter
- Sep 15, 2020
- 655 views
मुलुंड (शेखर भोसले) : आज सकाळच्या वेळेत भांडुप पश्चिम येथील जंगल मंगल रोडवर एका टेम्पोने एका स्कूटीला जोरदार धडक दिल्याने स्कूटीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले तर स्कूटीस्वार पायाला जबर मार बसल्याने जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. प्रकरण पोलिस स्टेशनला गेल्यावर तेथे टेम्पो मालक व स्कूटीस्वार या दोघांनी सामोपचाराने तडजोड करून परस्परांच्या सहमतीने प्रकरण मिटविले.
याबाबतच्या मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार सनील सरमळकर (वय २३) हा मुलुंड पूर्वेत राहणारा युवक, बिग बास्केट या कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे ग्राहकांना किराणा सामान पोहचवून तो आपल्या एमएच०३ सीसी ११६० या स्कूटीवरून परत आपल्या कामाच्या ठिकाणी येत असता पुढून येणार्या एमएच०३ सीव्ही १७२४ या टेम्पोने जोरदार धडक दिल्याने सुनीलच्या स्कूटीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले तसेच त्याच्या पायाला देखील जबर मार बसून पायाची खपली निघाल्याने रक्त वाहू लागले. सदर युवकाने ताबडतोब जवळचे भांडुप पोलिस ठाणे गाठून तेथील ड्युटी अधिकारी पोलिस निरीक्षक शिंदे यांच्याकडे तक्रार केली. दरम्यान पोलिस ठाण्याच्या समोरच असलेल्या दवाखान्यात जखमी सनीलवर उपचार करून जखमेवर मलमपट्टी करण्यात आली. टेम्पो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेवढ्यात जखमी युवकाची आई, मित्र व शिवसैनिक शेखर भोसले, प्रविण सावंत आणि हितेश जाधव यांनी भांडुप पोलिस स्टेशन गाठून पोलिस अधिकाऱयांशी व टेम्पो मालकाशी चर्चा करून हे प्रकरण सामोपचाराने बाहेरच्या बाहेर मिटवले. टेम्पो मालकाने या युवकाची स्कूटी दुरुस्त करून पुन्हा पूर्ववत करून देण्याचे मान्य केले.
रिपोर्टर