कोविड सेंटर मध्ये तरूणीचा विनयभंग, मुंबईत महिला असुरक्षित

मुंबई (जीवन तांबे) : कोविड सेंटर मध्ये महिलांवर  होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर अद्यापही प्रशासनाच अंकूश नसल्याच पहायला मिळत असून याचाच एक प्रत्यय  मुंबईतील मानखुर्द कोविड सेंटर मध्ये पाहायला मिळालं आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कोविड सेटर मध्ये २० वर्षीय

सेनिटायजरींग करणाऱ्या  तरूणाकडून विनयभंग केल्याची घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संतप्त घटनेने महिला सुरक्षा ऐरणीवर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिपेश सुर्यकांत  साळवी वय २० याला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

पालिकेच्या एम पूर्व विभागात येणाऱ्या मानखुर्द पीएमजीपी कोविड सेंटर मध्ये प्रत्येक रूम मध्ये सेनेटायजर करणाऱ्या एका नराधमाने कोविड रूग्ण असणाऱ्या १७ वर्षीय तरूणीसोबत जबरदस्ती करत अत्याचार केल्याची घटना सोमवारी दूपारी घडली. जेव्हा हा नराधम सेनिटायजर करण्याचा बहाण्याने रुम मध्ये शिरला तेव्हा ही मुलगी एकटीच होती. दरम्यान मुलीवर या नराधमाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत  तुम मुझसे प्यार करो असं म्हणत मुलीच्या अंगावर हात फिरवत चुंबन घेण्याचा प्रयत्न करत होता  तेव्हा मुलीने या प्रकाराचा तिरस्कार करत असताना  या नराधमाने मुलीच्या कानशिलात लगावली तेव्हा या पीडीत मुलीने एकच आरडाओरडा केला तेव्हा सेंटर मधील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले आणि आरोपी ला पोलिसांच्या स्वाधीन केले.  

या घटनेने कोविड सेंटर मधील महिला सुरक्षिततेचे धिंडवडे उडाले असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपी दिपेश साळवी नामक नराधमाला अटक केली असून त्याला आज न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या वारंवार

घडणाऱ्या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून यासंबंधी आम्ही अधिक तपास करत असल्याचे मानखुर्द पोलिस ठाणेचे वपोनी प्रकाश चौगुले यांनी माध्यमांना सांगितले.

संबंधित पोस्ट