
अनधिकृत बांधकामाच्या नादात एकाने केला फुटपाथ, झाड व वीज खांब गिळंकृत! या कामाला अभय कुणाचे घाटले ग्रामस्थांचा सवाल!
- by Reporter
- Sep 14, 2020
- 694 views
मुंबई (जीवन तांबे) : घाटले परिसरातील नागोजी भिकोजी पाटील मार्गावरील एका घरमालकाने चक्क चक्क अनधिकृत बांधकाम करीत झाड व वीज खांब फुटपाथ गिळंकृत केले आहे.
याकडे पालिका दुर्लक्ष करीत असल्याने घाटले गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे.
मुंबई मध्ये अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.
एखाद्याने सरकारी जागा पूर्ण पणे गिळंकृत केल्यावर तसेच पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने अनधिकृत कामाला आशीर्वाद मिळतो.
मग त्या बांधकावरून राजकीय वाद निर्माण झाला की सरकार व पालिकेला जाग येते. चेंबूर येथील घाटला गावातील पाटील मार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे.
या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावरील कोपरा वाढवत चक्क पूर्ण
फुटपाथ, झाड व वीज खांब घरात घेतला आहे.
जागेच्या लालसे पोटी कालांतराने या झाडाची कत्तल करण्यात येणार आहे.वीज खांब कापून टाकणार आहे.
चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने सरकार झाडे लावा म्हणून सतत जाहिरात करीत आहे. मात्र काही जण जागेच्या लालसे पोटी कित्येक झाडाची राजरोसपणे कत्तल करीत आहे. या झाडा बाबत हेच घडणार आहे. यात शंका नाही. या झाडाच्या कत्तल झाली तर ।संपूर्ण जबाबदारी एम पश्चिम पालिका अधिकारी यांची असेल तर विज खांबामुळे एखादा अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी वीज कंपनीची असेल. असा प्रश्न घाटला ग्रामस्थ उपस्थित केला आहे.
पालिका एम पश्चिम विभागाचे अधिकारी व वीज कंपनीचे अधिकारी जाणूनबुजून झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप ही ग्रामस्थानी केला आहे.
प्रतिक्रिया:-
१)अनिल ठाकूर . अध्यक्ष- घाटले ग्रामस्थ आगरी समाज समिती, भाजप मुंबई उपाध्यक्ष!
मुंबईतील अनधिकृत बांधकामा बाबत संवेदनशील असलेली पालिका याबाबत असंवेदनशील का?
पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता पालिका झाडे लावा सांगते. इकडे काहि महाभाग अनधिकृत बांधकाम करीत चक्क झाडाला ही सोडत नाहीत. याला पालिका अधिकारी जबाबदार आहे.
जर कोणी झाडाची कत्तल केली असे निदर्शस आले तर त्याच्यावर फैजदारी गुन्हा दाखल केला शिवाय गप्प बसणार नाही.
२) निलेश पवार (उद्यान झाडे अधिकारी)- (गार्डन ट्री ऑफिसर) एम पश्चिम विभाग चेंबूर,
याबाबत कोणताही अर्ज आमच्या कडे आलेला नाही.
आपण मला फोटो व पत्ता द्या मी पाहून कारवाई करतो. पालिका एम पश्चिम विभाग
रिपोर्टर