
विक्रोळीतील पादचारी उड्डाणपुलाच्या सुरक्षिततेसाठी एमएमआरडीएने उचलली आवश्यक पाऊले
- by Reporter
- Sep 14, 2020
- 1087 views
मुलुंड (शेखर भोसले) : पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळीच्या टागोर नगर आणि कन्नमवार नगर मधील पादचारी पुलाचे खांबे सर्व्हिस रोडला लागूनच असल्याने येथून जाणाऱया वाहनांचा धक्का खांबांना लागत होता परिणामी पादचारी पुलाला देखील धोका पोहचत होता. त्यामुळे काही ठिकाणी पुलाची पडझड झाली होती व भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. येथून जाणाऱया पादचाऱयांना व वाहनचालकांना या गोष्टीची जाणीव होताच त्यांनी स्थानि लोकप्रतिनिधींच्या नजरेत सदर बाब आणून दिली. येथील नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी मुरुडकर यांना बोलावून पुलाची पडझड दाखविण्यात आली तसेच इमारत क्र. ५२ च्या पाठीमागे
असलेल्या पादचारी पुलाच्या खांबांना वाहनांचा बसू शकणारा धक्का नजरेत आणून दिला व लवकरात लवकर पादचारी पूलाच्या खांबाला गाड्यांचा धक्का लागू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे सुचविले. नगरसेवकांनी केलेल्या सूचनेला अनुसरून व पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
एमएमआरडीएने आता त्या ठिकाणी पुलाच्या खांबा शेजारी लोखंडी सुरक्षा खांब लावण्यात सुरुवात केली असल्याचे दिसून आले आहेत.
पादचाऱयांच्या व वाहनचालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुलाची पडझड होवू नये व पुलाला कोणताही धोका पोहचू नये यासाठी आवश्यक ती सुरक्षा आम्ही घेत असून त्यादृष्टीने योग्य त्या उपाययोजना स्थानिक आमदार सुनिल राऊत व नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱयांनी याबाबत सांगितले असून पुलाला कोणताही धोका नसल्याचे जाहिर केले.
रिपोर्टर