
वॉर्ड क्र ११८ येथे नाल्याच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ
- by Reporter
- Sep 14, 2020
- 629 views
मुलुंड (शेखर भोसले) : आमदार सुनिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी कन्नमवार नगर २ मधील जयभीम नगर-२ येथे नाला नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ सोमवार दि १४ सप्टेंबर रोजी श्रीफळ वाढवून करण्यात आला. वार्ड क्र ११८ चे शिवसेना नगरसेवक तसेच स्थापत्य समितीचे अध्यक्ष (उपनगरे) उपेंद्र सावंत यांच्या प्रयत्नाने हे काम करण्यात येत आहे. यावेळी उपशाखाप्रमुख शरद दोडके, गटप्रमुख नरेश कीर, शिवसैनिक मंगेश बनसोडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर