
वॉर्ड क्रमांक ११७ मध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा
- by Reporter
- Sep 14, 2020
- 639 views
मुलुंड (शेखर भोसले) : भारतीय जनता पार्टीच्या विभाग क्र ११७ च्या वतीने दिनांक ६ सप्टेंबर रोजी खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विक्रोळी विधानसभा अध्यक्ष मंगेश जी पवार यांच्या नेतृत्वाखाली कांजूरमार्ग वॉर्ड क्र ११७ मध्ये १० आणि १२ वी मध्ये ८०% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ह्या कार्यक्रमाच्या व्यवस्थेपनेत कमलाकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले तर भाजपाच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष हातभार लावला.
मा आमदार तसेच भाजपा मुंबई उपाध्यक्ष मंगेश जी सांगळे, ई.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नारायण कदम,
वॉर्ड क्र.१२० चे वार्ड अध्यक्ष रमेश सिंग, वॉर्ड क्र.११८ चे वार्ड अध्यक्ष प्रथमेश राणे वॉर्ड क्र.११७ चे वार्ड अध्यक्ष वीरेंद्र महाडिक, महिला वार्ड अध्यक्ष प्रेरणा सरवणकर, सुमित खामकर, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन ई. मुंबई जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष रजनी रविंद्र कदम यांनी केले होते.
रिपोर्टर