रस्त्यावरील चेंबरचे झाकण दुरावस्थेत! पालिकेचे दुर्लक्ष

मुलुंड (शेखर भोसले) : मुलुंड पूर्व येथील स्टेशन परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी असलेले एमटीएनएलच्या चेंबरचे झाकण मोडकळीस आल्यामुळे तुटून आतमध्ये गेले आहे. या तुटलेल्या व आत गेलेल्या झाकणामुळे या चेंबरमध्ये कोणीही पादचारी पडू नये यासाठी तेथे काही नागरिकांनी झाडाच्या फांदया अडकवल्या आहेत परंतु रिक्षा, दुचाकी किंवा पादचारी रात्रीच्या वेळेत, अंधारात येथून गेल्यास अपघात होऊन गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती देताना येथील जागरूक महिला नागरिक कविता शिर्के यांनी सांगितले की, पालिकेने एमटीएनएलच्या अधिकाऱयांशी संवाद साधून या चेंबरचे झाकण तातडीने दुरुस्त करून घ्यावे व रस्ता वाहतुकीसाठी आणि पादचाऱयांसाठी मोकळा करण्यात यावा.

संबंधित पोस्ट