मुंबईच्या महापौरांनी SRA सोसाटीतील फ्लॅट बळकावला भाजपाचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : वरळीच्या गोमाता जनता एसआरए सोसायटीमधील फ्लॅट महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोडा मारल्यानंतर भाजपने आता शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे अनाधिकृत बांधकामे उघड करण्याचं काम सुरु केले आहे.

“वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रमांक २ मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रमांक १ मधील कार्यालय (केआयएस कॉर्पोरेशन सर्व्हिसेस) हे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावलं आहे. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनाखाली एका व्यक्तीला आणि ऑफिस हे गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आलं होतं. आता प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली येतो,असं म्हणत किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी काही कागदपत्रांसहित एक ट्विट केलं आहे

संबंधित पोस्ट