यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कारासाठी प्रवेशिका

मुंबई (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नवी मुंबई केंद्राच्या विद्यमाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून प्रमाण पत्र व रोख रुपये १५०००/- असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यासाठी प्रवेशिका मागविण्यात येत असून २६ सप्टेंबर २०२० पुर्वी सदर

प्रवेशिका प्रतिष्ठानकडे पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष प्रमोद कर्नाड व सचिव डॉ. अशोक पाटील यांनी केले आहे. नवी मुंबई परिसरातील मराठी साहित्य, संस्कृती तसेच कला - क्रीडा या शिवाय सामाजिक एकात्मता, विज्ञान तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक सामाजिक विकास, कृषी औद्योगिक समाज रचना, व्यवस्थापन प्रशासन यापैकी कोणत्याही एका क्षेत्रामध्ये भरीव कार्य व योगदान व्यक्ती किंवा संस्थेस पुरस्कार देण्यात येणार आहे. सदर पुरस्कार २५ नोव्हेंबर २०२० रोजी समारंभपूर्वक देण्यात येईल.

अधिक माहितीसाठी ९८६७६७३३१९ / ९०८२६९८९०४ / ९८१९३३९९४४  या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे‌.

संबंधित पोस्ट