
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची विरार ते चर्चगेट रेल्वे लोकल गाड्या सुरू करण्यासाठी सह्यांची मोहीम
- by Reporter
- Sep 12, 2020
- 810 views
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्रस्त झालेल्या सामान्य लोकांना नोकरी धंद्याच्या कामानिमित्त जाण्यासाठी रोज जास्त अतिरिक्त पैसे मोजून जावे लागते. नालासोपारा परिसरातील
प्रवाशांनी ही समस्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आणून दिली. याची तातडीने दखल घेऊन नालासोपारा शहर मनविसेच्या वतीने रेल्वे सुरू करण्यासाठी १ लाख सह्या वसई तालुक्यातून मुख्यमंत्री मा.ना.श्री उध्दवजी ठाकरे यांना पाठविण्यात येणार आहे, आणि वसई नालासोपारा विरार येथील रेल्वे प्रवाशांना रेल्वे लोकल सेवा बंद असल्याने होणारा त्रास निदर्शनास आणून देणार असल्याचे नालासोपारा शहर अध्यक्ष अमित नारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
रिपोर्टर