सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता मिळणेकरिताविहित निकषांची पूर्तता करणा-या व्यक्ती व संस्थांना २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्जकरण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.

संचालक, औद्योगिकसुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्यावतीने सुरक्षा लेखा परीक्षकम्हणून मान्यता देणेसाठी शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणा-या व्यक्तीकडूनअर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींनी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह दोनसंच २५ सप्टेंबर २०२० पर्यंत संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कामगारभवन, ई ब्लॉक, सी - २०, वांद्रे - कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०००५१ इथे सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी www.mahadish.in या संकेतस्थळास भेट द्यावी असेही संचालकांनीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट