
जिल्ह्यातील रानडुकरांचा बंदोबस्त करा शेकापची मागणी* अन्यथा विभागीय कार्यालयात डुकर सोडु- भाई मोहन गुंड
- by Reporter
- Sep 11, 2020
- 686 views
बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये रानडुकराने हैदोस घातला आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रानडुकरांची संख्या वाढली आहे या मध्ये वन विभागाकडून कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने शेकापचे भाई मोहन गुंड यांनी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिले आहे,
गेली अनेक दिवसांपासून शेतकऱ्यावर रानडुक्कर हल्ले करत आहे अनेक शेतकरी जखमी देखील झालेले आहेत रानडुकरं वीस ते पंचवीस टोळीने शेतामध्ये घुसतात घुसून जमीन उध्वस्त करून पिकाचे नुकसान करतात शेतकऱ्याच्या हाता तोंडाला आलेला घास नुकसान झाल्याने जात आहे रानडुक्कर पकडण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नेमून तात्काळ रानडुक्करांना बंदिस्त करावे अन्यथा वनपरिक्षेत्र प्रादेशिक अधिकारी विभागाच्या कार्यालयात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने डुकरं सोडून आंदोलन करण्याचा इशारा शेकापचे भाई मोहन गुंड भाई संग्राम तुपे भाई नारायण गोले भाई दत्ता प्रभाळे भीमराव कुटे मंगेश देशमुख,अर्जुन सोनवणे प्रवीण ज्ञानेश्वर गवते,दिनकर रिंगणे, सुनील रिंगणे,हानुमान शिंदे यांनी दिला आहे.
रिपोर्टर