पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद

मुंबई (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महाविद्यालयीन  काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सध्या हे सगळे वेळापत्रकच बदलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच  स्वच्छता, सामाजिक अंतर पाळणे, आरोग्य, आहार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे क्रीडा राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी संगितले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, पिरंगुट, पुणे येथील एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांशी  राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास, क्रीडा या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कोविड-१९ मुळे अनेक अडचणी येत आहेत. कोविडच्या  पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना पुढे कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी संबंधित विभागांचे मंत्री, राज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांनीही कोविड काळात काळजी घ्यावी आणि कोविडच्या सर्व नियमांचे पालन करावे,असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले

संबंधित पोस्ट